महाराष्ट्रात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट

Connect With Us

मुंबई: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. कोरोना सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात होते. सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत 63 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना झाला, तर 1.34 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले.

दरम्यान , आता केरळसोबत महाराष्ट्रातही परत एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर आहे. विशेष म्हणजे, कोरोनासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या कोविड टास्‍क फोर्सने राज्‍यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. कोविड टास्‍क फोर्सने सांगितल्यानुसार, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us