तालिबानच्या ‘या’ निर्णयाने भारताला मोठा धक्का

Connect With Us

अफगाणिस्तान : तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता त्यांच्याबरोबर शेजारी किंवा इतर देशांसोबतचे संबंध देखील बदलू लागले आहेत. भारत  आणि अफगाणिस्तान हे जवळचे मित्र आहेत,

परंतु, तालिबानने भारताविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार आता अफगाणिस्तानात भारताला व्यापारी आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

भारतीय निर्यात संघटनेचे संचालक डॉ. अजय सहाय यांनी यासंदर्भातील माहिती दिली. तालिबानने व्यापारी मालाची वाहतूक बंद केली आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे मालाची ये-जा होत असे. मात्र, आता तालिबान्यांनी हाच मार्ग रोखून धरल्यामुळे अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. भविष्यात तालिबानी प्रशासक काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष राहील, असे अजय सहाय यांनी सांगितले.  अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. सुकामेव्याच्या मिठायांच्या किंमतीही वाढणार असल्याचं चित्र आहे.

भारत हा अफगाणिस्तानचा सर्वात मोठा भागीदार

डॉ. अजय सहाई यांच्यानुसार, व्यवसायाच्या बाबतीत भारत हा अफगाणिस्तानचा सर्वात मोठा भागीदार आहे. 2021 मध्येच आपल्या देशातील निर्यात 835 मिलियन डॉलर होती. तर 510 मिलियन डॉलरची आयात होती. आयात-निर्यातीव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये सुमारे 400 योजनांमध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.

भारत सारख, चहा, कॉफी मसाला सहित अन्य वस्तूंची निर्यात करतो. तर ड्राय फ्रूट्स, कांदे इत्यादी मोठ्या प्रमाणावर आयात केले जातात. अशा स्थितीत येत्या काळात सुक्या मेव्याचे भाव वाढू शकतात.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us