हॉटेल, रेस्टॉरंट्स,आणि मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारची परवानगी

Connect With Us

अटी शर्थी लागू

मुंबई : १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल,रेस्टॉरंट्स, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. परंतु ही परवानगी काही अटी शर्थी लागू करण्यात आले. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

तसेच, रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात आली असली तरी त्यासाठी सरकारने अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. रेस्टॉरंट्स सुरु करायचे असतील तर काय आणि कोणती काळजी घेतली गेली पाहिजे याबद्दल राजेश टोपे यांनी सविस्तर सांगितलं आहे. ‘जे लोक जेवणासाठी आलेले असतील त्यांना वेटिंग पिरयडमध्ये मास्क घालणे बंधनकारक असेल. पूर्ण उपहारगृह सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे. वेटर्सनेसुद्धा मास्क वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्था ही सोशल डिस्टन्सिंगचा नियम लक्षात घेऊनच केलेली असावी. सर्व कर्मचारी तसेच मॅनेजमेंटने कोरोना लसीचा डबल डोस घेतलेला असणे गरजेचे आहे. या अटीशर्तीची पूर्तता केली असेल तरच रेस्टॉरंट्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच इनडोअर स्पोर्टस सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खेळाडू आणि चालकांसह सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं अनिवार्य आहे.

खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us