MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षा ‘या’ तारखेला होणार

Connect With Us

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोगानं निश्चित केलेल्या तारखेलाच होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला आयोजित केली जाणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना हॉलतिकीट उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगा-च्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता

4 सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे, असल्याचं आयोगाकडून परीपत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

दरम्यान, 4 सप्टेंबरलाच संयुक्त गट ब ची पूर्व परीक्षा होणार असून आता वेळापत्रकात बदल होणार नाही, असं देखील सागंण्यात आलं आहे. पूर्व परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी 1 तास आधी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांच पालन करून परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भातील परीपत्रक जारी केलं आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us