Delta Plus Variant: राज्यात वाढतोय डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यातील कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. अशातच आता राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यातील डेल्टा प्लस व्हेरियंटचे ४५ रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस आढळला आहे. राज्यात आढळलेल्या ४५ डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांपैकी २७ रुग्ण पुरुष असून १८ महिला आहेत.दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.
जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण असून रत्नागिरीमधील एक मृत्यू वगळता उर्वरित रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे स्वरुप सौम्य आणि मध्यम आहे. पुणे जिल्ह्यात डेल्टा प्लसचे तीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक भाग म्हणून एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत काही नमुन्यांची जिनोम सिक्वेसिंग करण्यात येते. जनुकीय रचनेत बदल होणे हा व्हायरसच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/