अकरावी प्रवेशाची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी उद्या जाहीर होणार

Connect With Us

पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरण्यासाठी विद्यार्थ्यांना रविवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. सोमवार आणि मंगळवारी या अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली.  त्यांनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडसह मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर महापालिका क्षेत्रातल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीची  अंतिम सर्वसाधारण पहिली गुणवत्ता यादी उद्या ( 25 ऑगस्टला ) जाहीर होणार आहे. त्यानंतर पहिल्या अकरावी प्रवेशाच्या फेरीसाठीची पुढची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मेरीट नंबर देण्यात येईल. पहिल्या फेरीसाठीची अलॉटमेंट जाहीर होईल. त्यानंतर 27 ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार आहे. पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कटऑफ वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील. 27 ऑगस्ट सकाळी 10 ते 30 ऑगस्ट संध्याकाळी 6 पर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचं कॉलेज निश्चित करायचं आहे. 30 ऑगस्टला 10 वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जाता वेबसाईटवर जाहीर केल्या जातील.

दरम्यान, यंदा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतल्या 310 महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी 1 लाख 11 हजार 125 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 77 हजार 285 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी 69 हजार 22 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरून लॉक केले आहेत. तसेच 68 हजार 367 विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. 59 हजार 886 विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाचा दुसरा भाग भरून पूर्ण केला आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 

 


Connect With Us