शाळा उघडण्याचा निर्णय येत्या चार-पाच दिवसांत निर्णय होईल; राजेश टोपेंची माहिती
पुणे: कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू केल्या जातील अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती, परंतु तत्काळ हा निर्णय रद्द करण्यात आला होता. दरम्यान आता राज्यातील शाळा कधी उघडायच्या याचा निर्णय येत्या चार ते पाच दिवसांमध्ये घेतला जाईल, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले. शिक्षण विभाग सध्या टास्क फोर्सच्या अहवालाची वाट पाहत आहे. हा अहवाल आल्यानंतर संबंधित विभागाकडून निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
तसेच, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मॉल आणि लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. लसीकरण झाल्यानंतरही कोरोना होणारच नाही, याची शाश्वती नाही. मात्र, लस घेतलेल्या व्यक्तींची प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. आता धार्मिक स्थळे आणि इतर ठिकाणच्या प्रवेशाबाबत लवकरच मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही टोपे यांनी म्हटले.
यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील धीम्या लसीकरणासाठी पुन्हा एकदा केंद्र सरकारला जबाबदार धरले. केंद्राकडून लस उपलब्ध होत नसल्याने राज्यात वेगाने लसीकरण करणे शक्य नाही. सध्या राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे राजकीय कार्यक्रम आणि इतर ठिकाणी होणारी गर्दी टाळावी. सप्टेंबर महिन्याच्या मध्यात तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, असे टोपे यांनी सांगितले.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/