‘कंचना 3’ अभिनेत्री अलेक्झांडरचा संशयास्पद मृत्यू

Connect With Us

गोवा : दक्षिण फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार राघव लॉरेन्सच्या ‘कांचना 3′ चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम केलेल्या अभिनेत्री अलेक्झांडर जावी हिचे निधन झाले आहे. तिने गोव्यात राहात असलेल्या घरात अखेरचा श्वास घेतला. ती २४व्या वर्षांची होती. तिच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला.

अहवालानुसार, पोलिसांना अलेक्झांडरचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेला आढळला. अलेक्झांडरने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे, परंतु तपासकर्ते सध्या पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत. शवविच्छेदनासाठी आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी अलेक्झांडरकडे कोणीही नसल्यामुळे गोवा पोलिसांनी रशियन दूतावासाला पोस्टमार्टमची कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी औपचारिक शिष्टमंडळ नेमण्यास सांगितले आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us