बैलगाडा शर्यतीवर लवकरच तोडगा : जयंत पाटील

Connect With Us

मुंबई : प्राण्यांच्या संरक्षणासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे तरी प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता सांगलीत 19 ऑगस्टला ही शर्यत पार पडली. गोपीचंद पडळकर यांनी त्याचं आयोजन केलं होतं. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी त्यानंतर गुन्हे दाखल करून चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल, असं आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रालयात जमलेल्या शेतकऱ्यांना दिलं आहे. बैलगाडा शर्यतीच्या मुद्दयावर आयोजित एका बैठकीत ते बोलत होते.

“बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. यासाठी सराव सुरू करण्यासाठी दिलासादायक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील बैलगाडा स्पर्धा पूर्ववत सुरू राहण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहेत. स्पर्धा सुरु करण्यासाठी सर्व विधानसभा सदस्य सकारात्मक आहेत,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार निलेश लंके, किसन काथोरे, अनिल बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि राज्यातील बैलगाडी मालक आणि संघटनेचे पदाधिकारी तसंच पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us