रासपाचे कलेक्टर कार्यालयासमोर मुंडन आंदोलन
बीड : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे दोन मुलींचा नदीच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी महसूल विभाग सर्वस्वी जबाबदार असून दोषीं विरोधात अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. तत्काळ ही कारवाई करण्यात यावी तसेच, मादळमोही येथील पवन गावडे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी देखील लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन करून आंदोलन करण्यात आले. यावेळी ५१ कार्यकर्त्यांनी मुंडन केले
तसेच, वाळू तस्करांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे दोन्ही मुलींचा बळी गेला आहे, या प्रकरणी प्रशासनाने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मुलींच्या मृत्यू प्रकरणी राक्षसभुवन ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी व तहसिलदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे, दत्ताभाऊ काळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदाताई सारुक, जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई शिंदे, कर्मचारी जिल्हा अध्यक्ष भगवान माने, पद्मराज वैराळ , जिल्हाध्यक्ष युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर, ओ बी सी जिल्हाध्यक्ष भागवत जवंजाळ, पवन गावडे, कृष्णा धापसे, अशोक आपके, पोपट भावले, चांगण सर, विक्रम सोनसळे , भागवत चोपडे, कल्पेश भोंडवे, प्रेम धायगुडेव आदि. कार्यकर्ते उपस्थित होते.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/