अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्युबाबत राखी सावंतनं केलं धक्कादायक विधान, म्हणाली..
‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले त्यामुळे सिद्धार्थच्या कुटुंबियांपासून ते टीव्ही इंडस्ट्री ते सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत अनेकांना धक्काच बसला आहे. सिद्धार्थच्या अशा अचानक जाण्याने कोणालाही विश्वास बसेनासा झाला, यामध्येच राखी सावंतने एक व्हिडीओ शेअर करत धक्कादायक खुलासा केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने सिद्धार्थचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झाला नाही, मग नेमका कशामुळे झालाय असा प्रश्न उपस्थित केला आहे.
आता मी घरात आहे आणि घरातून बाहेर पडणंही मला शक्य होत नाहीये. सिद्धार्थच्या मृत्यूमुळे मी पुरती हादरुन गेले आहे. पण आताच मला असं समजतंय की सिद्धार्थचं निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालं नाही. मग नेमकं कशामुळे झालं? साडे तीन तास वेगवेगळ्या डॉक्टर्सने सिद्धार्थच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. यावेळी मिळालेल्या रिपोर्ट्समध्ये सिद्धार्थचं निधन हार्ट अॅटॅकमुळे झालंच नाही असं सांगितलं आहे. मग त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. त्याच्या मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी आता काही गोष्टींचा तपास सुरु करण्यात येत आहे. मला खरंच या सगळ्याची फार चिंता वाटते”, असं राखीने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
http://www.instagram.com/tv/CTepf6EnYiU/?utm_source=ig_web_copy_link
पुढे ती म्हणते, “त्याच्या BMW गाडीच्या काचाही तुटलेल्या होत्या. त्याचं कोणाशी भांडण झालं असेल? असं म्हणतायेत ८ ते ८.३० च्या दरम्यान तो कोणाला तरी भेटायला गेला होता. त्यानंतर घरी आल्यावर बरं वाटत नाही असं आईला म्हणाला. रात्री ३ वाजता त्याला पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने काही औषधं घेतली. ती औषधी कोणती होती? बिल्डिंगमध्ये त्याचं भांडण झालं होतं, गाडीच्या काचा फोडल्या होत्या. हे देवा नेमकं सत्य काय आहे?. त्याच्यावर कोणता दबाव होता का?, त्याचं कोणाशी भांडण झालं होतं का?, ती कोणती औषधं होती? हे सगळं समोर आलं पाहिजे. त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे हे सगळ्या चाहत्यांना ऐकायचं आहे आणि हे फक्त डॉक्टरच सांगू शकतात.”
दरम्यान, सिद्धार्थचं २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून कूपर रुग्णालयाने त्याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, राखीच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/