मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, काही ठिकाणी कित्येक वर्षात पहिल्यांदाच पूर
औरंगाबाद: औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला. औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही भागात मंगळवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अतिवृष्टीला सुरुवात झाली. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच मराठवाड्यात पावसाचा महाप्रताप पहायला मिळत आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षराश: धुमाकूळ च घातला आहे.
काही भागांमध्ये काल दिवसभर पावसाचा सपाख्य रस्त्याशी जोडणारे लहान पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीज टा सुरुच होता. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नदी-नाले ओसंडून वाहत असून असंख्य गावांत घरात पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीज गायब झाल्याने, पुराचे पाणी आणि अंधार यामुळे विविध गावांमधील नागरिकांनी मंगळवारची अख्खी रात्र जागून काढली..
रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक हर्सूल तलाव ओसंडून वाहू लागला. तलाव पूर्णपणे भरल्यामुळे तलावाच्या सांडव्यातून पाणी वहायला सुरुवात झाली आहे. दरम्यान हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे खाम नदीला पूर आला आहे.
तर, कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अंजना-पळशी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. परिणामी अंजना नदीला पूर आला. ही नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दहा गावांचा संपर्क तुटला. सोमवारी रात्रीपासून पिशोरला मुसळधार पाऊस होत असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने गावांतील नागरिकांचे खूप हाल झाल्याचे वृत्त दै. लोकमध्ये प्रकाशित झाले आहे. या परिसरातील भारंबा, भारंबा तांडा, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, कोळंबी, जैतखेडा, साळेगाव, साळेगाव तांडा, पळशी बु., पळशी खुर्द आदी गावांचा पिशोरशी संपर्क तुटला आहे.
दरम्यान, पाचोड परिसरात मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपासूनच वीजेच्या गडगडाटासह अतिवृष्टीला सुरुवात झाली. पाचोडमध्ये पोलिस कॉलनीसह औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाले. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. अनेक घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंची मोठी हानी झाली. कापूस, तूर, मूग, मका, बाजरी ही पिके अतिवृष्टीमुळे खराब झाली. उभ्या शिवारात पाण्याचा प्रवाह शिरल्याने पिके झोपल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/