तुळजाभवानी मंदिरासमोर पुजारी-व्यापाऱ्यांचं लाक्षणिक उपोषण सुरू
‘दार उघड बये आता दार उघड’, ‘आई राजा उदो उदो’ अशी घोषणाबाजी करत पुजारी-व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.
उस्मानाबाद: कोरोना सुरू झाल्या पासून राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले. परंतु जसजसे कोरोना चा प्रभाव ओसरत गेला. तसतसे राज्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले, परंतु अद्यापही मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर सुरू करण्यासाठी तुळजापूर येथील पुजारी व व्यापारी आक्रमक झाले आहे. मंदिर सुरू व्हावे म्हणून व्यापारी आणि पुजाऱ्यांनी मंदिरासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. ‘दार उघड बये आता दार उघड’, ‘आई राजा उदो उदो’ अशी घोषणाबाजी करत पुजारी-व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
मंदिर बंद असल्याने पुजारी आणि व्यापाऱ्यांची उपासमार होत असून अर्थकारण ठप्प झाले आहे. राज्यातील सर्व व्यवहार खुले झाले आहेत. रेल्वे, बस, मॉल, दारूचे बार सुरू आहेत. तरीही मंदिर, धार्मिक स्थळे बंद का? असा सवाल पुजाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या लाक्षणिक उपोषणात व्यापारी, नागरिक सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास तुळजापूर बेमूदत बंद करण्याचा इशारा पुजाऱ्यांनी यांनी दिला आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/