Tokyo Paralympics 2020 : प्रमोद भगतला सुवर्ण, तर मनोज सरकारला कांस्यपदक !
टोकियो येथे खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिकखेळांमध्ये भारतासाठी आजचा दिवस अतिशय खास होता. भारतीय खेळाडूंनी आज बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास रचला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या प्रमोद भगतनं टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुषांच्या SL3 प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. तर याच प्रकारात मनोज सरकारने जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत करत कांस्यपदक पटकावले.
World Champion, and now Paralympics Champion 👑
Here's the moment when Pramod Bhagat scripted history. #Gold medallist in #ParaBadminton's first ever edition at the #Paralympics👐#Tokyo2020 pic.twitter.com/DJRYqtldKE
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) September 4, 2021
पहिल्या गेममध्ये प्रमोदनं ३-६ अशा पिछाडीवरून ८-६ अशी आघाडी घेतली. ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूला प्रमोदनं चांगलंच दमवलं. त्यानं ही आघाडी ११-८ अशी भक्कम केली. ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूनं कमबॅक करताना ही पिछाडी कमी केली, परंतु प्रमोदनं त्याला डोईजड होऊ दिले नाही. त्यानं पहिला गेम २१-१४ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये डॅनिएलनं ११-४ अशी मोठी आघाडी घेत कमबॅक केले. प्रमोदनं पुढील ९ गुणांपैकी ७ गुण घेत हा गेम ११-१३ असा अटीतटीचा बनवला. प्रमोदनं त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही आणि हा गेम २१-१७ असा जिंकून सुवर्णपदक निश्चित केलं.
@manojsarkar07 wins #Bronze 🥉at #Tokyo2020 #Paralympics #Badminton Men's Singles SL3! Double Podium Finish has become #India's thing at #TokyoParalympics!🤩✨🤩 #Praise4Para #Parabadminton #UnitedByEmotion #StrongerTogether
Medal no.1️⃣7️⃣ for India at #ParalympicsTokyo2020 🎉🏸 pic.twitter.com/PKkdBMQo2z— Paralympic India 🇮🇳 #Cheer4India 🏅 #Praise4Para (@ParalympicIndia) September 4, 2021
भारताच्या मनोज सरकारने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी वर्ग SL3 बॅडमिंटन स्पर्धेतही चमत्कार केला. त्याने कांस्यपदक जिंकले. मनोजने जपानच्या डेसुके फुजीहाराचा सरळ गेममध्ये 22-20 आणि 21-13 असा पराभव केला. हा सामना 47 मिनिटे चालला.भारतानं यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत चार सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण १७ पदकांची कमाई केली.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/