…तर पेट्रोल-डिझेल ७० ते ७५ रुपयांत मिळू शकेल; आज घेतला जाणार महत्वपूर्ण निर्णय

Connect With Us

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची आज (१७ सप्टेंबर) लखनऊ  येथे बैठक होणार आहे. बैठकीमध्ये चार डझनाहून अधिक घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्यासंदर्भातील महत्वाच्या निर्णयावर चर्चा होणार असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे.

इंधनांवर खरोखर जीएसटी लागू झाल्यास पेट्रोल व डिझेल तसेच नैसर्गिक वायू खूप स्वस्त होऊ शकेल. पण इंधनांवरील करांतून आमचे सर्व कर बंद होतील आणि त्याचा आमच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल, अशी भीती अनेक राज्यांनी व्यक्त केली आहे.

इंधन जीएसटीच्या कक्षेत आणल्यास पेट्रोल ७५ रुपये, तर डिझेल ६८ रुपये लिटर दराने मिळेल. केरळ उच्च न्यायालयाने जूनमध्ये पेट्रोल-डिझेलला जीएसटीखाली आणण्याच्या मुद्यावर विचार करण्याचा निर्देश दिले होते. त्याआधारे प्रस्ताव आणला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र जीएसटी लागू केल्यास राज्यांना आपले सर्व कर मागे घ्यावे लागतील.

दरम्यान, सध्या मुंबईत पेट्रोलचा दर ११० रुपयांच्या तर डिझेलचा दर ९७ रुपयांच्या आसपास आहे. केंद्र सरकार पेट्रोलवर ३२ टक्के कर लावते, तर राज्य सरकारने २३.०७ टक्के व्हॅट लावतात, डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क ३५ टक्क्यांहून अधिक राज्याचा व्हॅट १४ टक्यांपेक्षा अधिक आहे. दोन्ही इंधने जीएसटीच्या कक्षेत आल्यास या करांमध्ये मोठी कपात होईल आणि पेट्रोल व डिझेल ७० ते ७५ रुपयांत मिळू शकेल.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us