पवनदीप ठरला ‘इंडियन आयडल12’चा विजेता, मिळाले ‘इतके’ लाख रुपये

Connect With Us

गेल्या वर्षी सुरू झालेला ‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12 Finale ) या देशातील सर्वात लोकप्रिय शोचा विजेता कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच 12 च्या ठोक्याला विजेत्याच्या नावाची घोषणा झाली. पवनदीप राजन हा ‘इंडियन आयडल 12’ चा विजेता ठरला. तर अरूणिता कांजीलाल ही उपविजेती ठरली. पवनदीप राजन व अरूणिता हे दोघेही शोच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. अखेर चाहत्यांच्या मतांच्या आधारावर पवनदीपने बाजी मारली

इंडियन आयडल १२’च्या ट्रॉफीसोबतच पवनदीपला लक्झरी कार आणि २५ लाख रुपये बक्षीस स्वरुपात मिळाले आहेत.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘इंडियन आयडल ११’चा फिनाले पार पडला. यंदाचा फिनाने तब्बल १२ तास चालला. या १२ तासात अनेक गेस्टनी उपस्थितीने लावली आणि य़ा गेस्टसोबत स्पर्धकांनी धमाल केली.

 

यंदाच्या ‘इंडियन आयडल १२’ मध्ये मोठी टक्कर पाहायला मिळाली. ६ स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहचले होते. पवनदीप राजन, मोहम्मद दानिश, शनमुखाप्रिया, अरुणिता कांजीलाल, निहाल आणि सायली कांबळे या स्पर्धकांमध्ये फिनालेची चुरस रंगली. या स्पर्धेत विजेते न ठरलेल्या इतर स्पर्धकांच्या परफॉर्मन्सने देखील अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us