पंकजा मुंडे यांचं स्वातंत्र्य दिनानिमित्त अनोख आयोजन
मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जनतेला 15 ऑगस्ट रोजी परळी येथील वैद्यनाथ मंदिराच्या येथे होणार्या ‘जन गण मन’ या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच आवाहन केले आहे. सकाळी ८ वाजता परळी वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी सर्व एकत्र जमणार असून ८:३० वाजता राष्ट्रगीत होणार आहे. कार्यक्रमास फक्त परळीच नव्हे तर बाहेरून येणार्यांच सुद्धा स्वागतच असल्याच त्या म्हणाल्य. सर्वांनी कुटुंबासहित या ठिकाणी यावे परंतु कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करा असेही आवर्जून सांगितले. फेसबूक विडियो शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोना मुळेशाळा कॉलेज बंद असल्याने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनीही यावे, तसेच कार्यक्रमास येणार्या विद्यार्थी, ज्यांना रस आहे त्यांनी विविध वेशभूषा करून यावे, भगत सिंग, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, भारतमाता, इतकेच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या ऑलिंपिक मधील खेळाडूंची वेशभूषा सुद्धा करू शकतात. तसेच, तिथे परीक्षकांमार्फत गुप्त पणे परीक्षण केले जाणार असून, विविध परितोषिकांच आयोजन करण्यात आले आहे . तसेच सेवेत असणार्या आणि सेवानिवृत्त सैनिकांच स्वागत करण्यात येणार आहे.असेही त्यांनी सांगितले.
तसेच, ‘’आपण सर्व जन एकत्र येवूया, मग तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, तुम्ही कोणतीही बोलीभाषा बोलत असाल, तुम्ही कोणत्याही विचारांचे असाल, हे महत्वाच नाही, आपण एक भारतीय म्हणून एकत्र येऊ’’ अस आवाहन त्यांनी या विडियो मार्फत केले आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/