एका दिवसात एक कोटी! लसीकरणात देशाचा नवा उच्चांक
नवी दिल्ली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात सध्या लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे, या लसीकरण मोहिमेला भारताला मोठे यश मिळाले आहे. कोरोनाच्या लसीकरणात देशाने काल शुक्रवारी दिवसभरात एक कोटी पेक्षा जास्त लसीकरणाचा उच्चांक गाठला आहे .
केंद्र सरकारने डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले हाेते. त्यासाठी दरराेज एक काेटी डाेस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले हाेते. शुक्रवारी हे लक्ष्य गाठण्यात यश आले.
देशभरात एकूण ६२ काेटी १२ लाख ११ हजार ७१३ डाेस देण्यात आले आहेत. त्यापैकी ४८ काेटी लाेकांना पहिला डाेस तर १४ काेटी लाेकांना दाेन्ही डाेस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या जवळपास अर्ध्या लाेकसंख्येला किमान एक डाेस देण्यात आला आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २८ लाख डाेस देण्यात आले. त्याखालाेखाल महाराष्ट्रात ९ लाख ९० हजार डाेस देण्यात आले.
दरम्यान, लसीकरणाचा आकडा वाढला असला तरीही नागरिकांनी काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. सप्टेंबर आणि ऑक्टाेबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. nअशा परिस्थितीत काेराेना प्रतिबंधक नियमांचे काटेकाेरपणे पालन करण्याचे आवाहन आराेग्य मंत्रालयाने केले आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/