गणेशोत्सवात रात्रीची संचारबंदी? मुख्यमंत्री दोन दिवसांत घेणार निर्णय

Connect With Us

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अधिक खबरदारी घेत आहे. दरम्यान, गणेशोत्सव अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव काळात गर्दी होऊ नये यासाठी कोरोना निर्बंध कठोर करण्यात येऊ शकतात. तसेच राज्य कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री रात्रीच्या संचारबंदीबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळे गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करुन देणार असल्याचे सर्व गणेश मंडळांनी ठरवलं आहे.लालबागमधील सर्व गणेश मंडळे, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस, सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत लालबागमधील सर्व गणपतींचे दर्शन हे ऑनलाईन पद्धतीने भाविकांना देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली होती. मात्र या बैठकीत राज्यात गणेशोत्सवादरम्यान नाईट कर्फ्यू लावण्याबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. मात्र मुख्यमंत्री येत्या दोन दिवसांत रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांतील गणपतीचे दर्शन सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाईद्वारे देण्यात येणार आहे.

दरम्यान, गणपतीचे आगमन हे साध्या पद्धतीने झाले पाहिजे या वेळी कोणतेही ढोल, रॅली काढण्यात येऊ नये अशा पद्धतीच्या सुचना प्रशासनाकडून पोलीस दलाला देण्यात येणार आहेत. तसेच गणेश मुर्तींचे विसर्जन साध्या पद्धतीनेच स्थानिक पातळीवर करण्याबाबत मार्गदर्शक सुचना आज संध्याकाळपर्यंत जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. कृत्रिम तलाव तयार करुन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. मोठ्या गणपतींचे आणि दहा दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनावेळी कोणताही गाजावाजा न करता, ढोल, ताशे न वाजवता या गणपती मुर्तींचे देखील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासंदर्भात सूचना जारी करण्यात येणार आहेत.

 

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us