नाशिक गंगापूर धरण ; आज दुपारी १ वाजेपासून पाण्याचा 6000 क्युसेक विसर्ग सुरू

Connect With Us

नाशिकः  गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे. नाशिकला पाणीपुरवठा करण्यार्‍या गंगापूर धरण परिसरात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे आज दुपारी एक वाजेपासून या धरणातील पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने 6000 क्युसेक्स करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

 यापूर्वी गोदावरीला एक पूर येऊन गेला आहे. गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील आळंदी धरण शंभर टक्के भरले आहे. गौतमी गौदावरीचा साठा 97 टक्क्यांवर, तर काश्यपीचा जलसाठा 87 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे.  दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील गंगापूरसह, दारणा  दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही भरत आली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us