राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल MPSC कडून जाहीर !

Connect With Us

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा 2020 राज्यातील विविध केंद्रांवर 21 मार्चला घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आयोगाने मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली आहे.

कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती.
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला असून. 200 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची उत्सुकता लागून राहिली आहे.
तसेच, विद्यार्थ्यांनी निकाल https://mpsc.gov.in/downloadFile/english/3964 येथे पाहता येईल.

दरम्यान, नाशिकमधून (nashik)220, नगरमधून 177(nagar), जळगाव 47(jalgaon), धुळे (dhule), 35 तर नंदुरबारमधून (nandurbar)10 जणांची निवड झाली आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us