ध्वजारोहणानंतर खासदार राष्ट्रगीतच विसरले! Video व्हायरल

Connect With Us

नवी दिल्ली : काल देशभरात 75 वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला . विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान ध्वजारोहण कार्यक्रमानंतर खासदार राष्ट्रगीतच विसरल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये ही घटना घडली आहे. सपा खासदार डॉ. एस.टी. हसन झेंडावंदन केल्यानंतर राष्ट्रगीतच विसरल्याची घटना समोर आली आहे. पहिल्या काही ओळ म्हटल्यानंतर त्यांनी थेट शेवटची ओळ म्हंटली.

मिळालेल्या माहितीनुसार,ध्वजारोहण झाल्यानंतर प्रत्येकाने राष्ट्रगीत गायला सुरुवात केली, पण जेव्हा ते खासदार दुसऱ्या ओळीवर अडकले तेव्हा त्यांनी इकडे तिकडे पाहण्यास सुरुवात केली. सर्वच जन राष्ट्रगीत विसरले. यानंतर एस.टी. हसन यांनी थेट शेवटची ओळ म्हणजेच जय हो म्हणायला सुरुवात केली आणि ते कार्यक्रम संपवून निघून गेले. मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. यानंतर लोकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपाचे नेते संबित पात्रा यांनी खासदारांचा राष्ट्रगीत म्हणतानाचा हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच “वाह समाजवादियों वाह” असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सपा खासदारांचा राष्ट्रगीत म्हणतानाचा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.  या कार्यक्रमाला सपाचे खासदार डॉ. एसटी हसन यांच्यासह जिल्हा अध्यक्ष डीपी यादव, महानगर अध्यक्ष शाने अली आणि अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केलं.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us