महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
नवी दिल्ली: मोदी सरकारनं राज्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली. पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत केंद्राकडून जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसानं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर राज्य सरकारनं एनडीआरएफमधून अर्थसहाय्य करण्याची विनंती केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. याच अधिवेशनात कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. केंद्रानं राज्याला ७०० कोटींची मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे.