गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी धावणार “मोदी एक्सप्रेस”
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी “मोदी एक्सप्रेस” दादर स्टेशनवरुन धावणार असल्याची माहिती भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. या ट्रेनने विनामुल्य प्रवास करता येणार असून प्रवाशांना एकवेळचे जेवणही देण्यात येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले असून, एकूण १८०० नागरिक या ट्रेनचा लाभ घेऊ शकणार आहेत.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबई आणि राज्यातील कोकणी माणूस आपल्या गावी जात असतो. कोरोनाच्या संकटात ट्रेन बंद असल्यामुळे आणि वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे चाकरमान्यांना अडचणी येत आहेत. दरम्यान, या वर्षी देशाचे पंतप्रधान मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून खास ट्रेन सोडण्यात येणार आहे. मात्र भाजप नेते नितेश राणे यांनी मोफत मोदी एक्सप्रेसची घोषणा केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार माणण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्सप्रेस सोडत आहोत.
कोकणात जाणारी मोदी एक्सप्रेस दादर येथून सोडण्यात येणार असून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. दादरमध्ये प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन मोदी एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. तसेच या प्रवासात नागरिकांना एकावेळचे जेवण दिले जाणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/