मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुढील आठवड्यात नाशिक दौरा

Connect With Us

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगामी नाशिक दौऱ्याच्या नियोजना करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे संपन्न झाली. दिनांक २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान राज ठाकरे, युवानेते . अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे सर्व प्रमुख नेते यांचा नियोजित नाशिक दौरा, नूतन शाखा अध्यक्षांच्या नेमणुका, महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांची तयारी आदि विषयांवर या बैठकीत अत्यंत सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.

या वेळी बैठकीत शहर अध्यक्ष अंकुश पवार यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचे स्वरूप या विषयावर मार्गदर्शन केले. तर जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी शाखा अध्यक्षांचा नियोजित मेळावा, संपूर्ण शहर भगवामय करण्याचा निर्धार व्यक्त करीत मनपाच्या परवानगीने विविध ठिकाणी फलक लावण्याबाबत सांगितले, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम यांनी विभाग अध्यक्षांच्या माध्यमातून दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीस पूर्ण ताकदीने व एकजुटीने सामोरे जाण्याचा व आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना अपेक्षित नाशिक महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी झटण्याचा संकल्प व्यक्त करीत आगामी मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांना मार्गदर्शन केले.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुशभाऊ पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलिम (मामा) शेख, नगरसेवक योगेश शेवरे, विभाग अध्यक्ष नितीन साळवे, सत्यम खंडाळे, विक्रम कदम, भाऊसाहेब निमसे, रामदास दातीर, योगेश लभडे, महिला सेनेच्या कामिनिताई दोंदे, अर्चनाताई जाधव, अरुणाताई पाटील, सुजाताताई डेरे, स्वागताताई उपासनी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व सर्व अंगीकृत संघटनाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्र संचालन विक्रम कदम यांनी केले. तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब निमसे यांनी केले.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us