सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेले लाखो रुपये पोस्टातून गायब !
नवी दिल्ली : सुकन्या समृद्धी योजना आणि बचत खात्याअंतर्गत जमा केलेले लाखो रुपये उत्तर प्रदेशच्या पोस्ट ऑफिसमधून अचानक गायब झालेत. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील बरौत भागातील पोस्ट ऑफिसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोस्टाने विभागीय चौकशीत दोषी आढळलेल्या एका अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
खातेधारकांना वाटले की, त्यांच्या कष्टाचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये जमा केले जात आहेत. काही गावकरी पासबुकमध्ये एंट्री घेण्यासाठी गेले असता, त्यांनी संगणकाद्वारे आपले पासबुक अपडेट करण्यास सांगितले. संगणकावर प्रवेश केल्यानंतर त्यांनी जमा केलेली रक्कमच नव्हती. यानंतर त्यांनी हेड पोस्ट ऑफिस बरौतमध्ये एंट्री केली, तरीसुद्धा त्यांच्या खात्यात पैसे नव्हते. मग हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दोषी आढळलेल्या अधिकाऱ्याविरोधात खटला दाखल करण्याची तयारीही करण्यात आली आहे. अनेक गावकऱ्यांनी आपल्या गावाच्या पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास 18.50 लाख रुपये जमा केले होते. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, बचत खाते आणि आरडीमधील पैशांचा समावेश होता. मीडिया रिपोर्टनुसार, पोस्ट ऑफिसमध्ये तैनात असलेला अधिकारी देवेंद्र यांनी ही रक्कम चोरली.
दरम्यान, तपासात दोषी आढळल्यानंतर अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. अधिकाऱ्याकडे कोणी पैसे जमा करायला गेल्यानंतर तो त्यांच्याकडून पैसे घ्यायचा, पण खात्यात जमा केल्याची एंट्री करायचा नाही. यासोबतच तो खातेदारांच्या पासबुकची हातानेच एंट्री करत होता. तो जमा केलेले पैसे त्याच्याकडे ठेवत असे. अशा प्रकारे त्याने 18 लाख 50 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/