महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं दिला अतिवृष्टीचा इशारा!
मुंबई : आता हवामान विभागाने राज्यातल्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
दरम्यान, ठाण्यात आज आणि उद्या तर मुंबईत उद्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.