नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; कुटुंबियांच्या आरोपाने खळबळ
नाशिक : नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. स्वप्नील शिंदे (Swapnil Shinde) असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या (Medical Student Suicide) केल्याचा दावा त्याच्या कुटूंबियांनी केला आहे. हा विद्यार्थी गायनॅकॉलॉजीच्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत असल्याचे समजते.
स्वप्नील शिंदे मेडिकल कॉलेजमधील ऑपरेशन थिएटरच्या बाजूला असलेल्या वॉशरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. स्वप्नीलने रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास डॉ. जितेंद्र खोडीलकर यांनी त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल आहे.
फेब्रुवारीपासून तो बीड (BEED) येथील त्याच्या घरी होता. जूनमध्ये तो कॉलेजला परतल्यानंतर त्याच्या आईला त्याच्यासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याची आई त्याच्यासोबत येथेच राहत होती, मात्र त्यांनीही आपल्याकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे प्राचार्या पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, रॅगिंगमुळेच आत्महत्या झाल्याचाही आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांकडून केला जात असून डॉ स्वप्नीलसोबत शिक्षण घेत असलेल्या मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.दुसरीकडे कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे. कॉलेज प्रशासनने स्वप्नीलची आत्महत्या नसून तो चक्कर येऊन पडल्याचा दावा केला आहे.
स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणार्यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.