राज्यात २ हजार ४८६ नवीन कोरोनाबाधित तर २ हजार ४४६ रूग्ण कोरोनामुक्त
आज महाराष्ट्र राज्यात २ हजार ४८६ नवीन कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली असून २ हजार ४४६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजची बधितांची संख्या ही कोरोना मुक्त रुग्णाच्या तुलनेत थोडी जास्त आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,९९,४६४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,००,५७,३२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,७५,५७८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आजपर्यंत १,३९,५१४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/