महादेव जानकरांचा थेट कृषी मंत्र्यांना फोन; शेताच्या पाहणीसाठी शास्त्रज्ञांची टिम होणार दाखल
सांगली : सांगली जिल्ह्यातील तालुका आटपाडी, शेटफळे येथील शेतकरी चंद्रकांत विनायक गायकवाड यांच्या २५ एकर शेतातील डाळिंबाच्या बागेवर मर नावाचा रोग पसरल्याने बागेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, माजी पशू संवर्धन मंत्री महादेव जाणकर यांनी गायकवाड यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी शेतकार्याची व्यथा एकूण महादेव जाणकर यांनी शेताच्या बांधावरून थेट राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना फोन केला व शेतकर्याला न्याय देण्यासाठी स्थानिक कृषी अधिकार्यांना पाहणी करण्यासाठी पाठवावे अशी विनंती केली. यावर कृषी मंत्री भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित कार्यवाही सुरू केली.
त्या संदर्भात आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी आदेश पत्र काढले असून गायकवाड यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी शास्त्रज्ञांची टिम नेमली आहे. पाहणी करून संभाव्य कारणे आणि त्यावरील उपाययोजना करण्याकरिता ही टिम नेमण्यात आली आहे. तसेच, पाहणी करून योग्य तो सल्ला आणि कार्यवाही करून कार्यालयास कळविण्यात यावे असे आदेश देखील देण्यात आले आहेत. या आदेशामुळे शेतकर्याला नक्कीच न्याय मिळेल अशी भावना तेथील शेतकर्यांमध्ये निर्माण झाली असून त्यांनी माजी मंत्री महादेव जाणकर व कृषी मंत्री दादा भुसे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/