लाडकी बहीण योजना : ”त्या” गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचे आदिती तटकरेंनी केले आवाहन
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास शुक्रवारपासून सुरू झाला आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 हजार रुपये देण्यात येतात. मात्र आता पात्र लाभार्थींच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. कारण या योजनेसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. निकषांत न बसणारे अर्ज योजनेतून वगळण्यात येऊ शकतात. इतर निकषांत न बसणाऱ्या महिलांचेही अर्ज छाननी मध्ये बाद होऊ शकतात अशी चर्चा आहे.
निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांनी पैसे परत करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं. मात्र थोड्याथोडक्या नव्हे तर 30 लाख अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची बातमी एका वृत्त वाहिनीने होते. अपात्र 30 लाख लाडक्या बहिणींना सरकारकडून तब्बल तीन हजार कोटी रुपये मिळाल्याचेही त्यामध्ये म्हटले होते. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती. मात्र आता या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात येणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं. ” लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या काही बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. काही हजारोंच्या संख्येने अर्ज आले आहेत. त्या महिलांनी आवाहनानंतर आपली लाडकी बहीण योजना सोडून दिली आहे. पण अजून आमच्या विभागाने किती महिला अपात्र होणार यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली नाही आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये येणाऱ्या सर्व बातम्या या खोट्या आहेत. माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून या बातम्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये ” असे अदिती तटकरे म्हणाल्या.रायगडमध्ये आज त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. त्यानंतर माध्यमांशी बोलत होत्या.