बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण महिना सुरु झाला की, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे वेध लागतात. रक्षा बंधन म्हणजे, राखी पौर्णिमा. हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते , बहिणीने भावाला राखी बांधली की भाऊ तिला ओवाळणी देतो. विवाहित महिला या सणासाठी आवर्जून माहेरी जातात. या सणाची प्रत्येक गोष्टच निराळी असते, परंतु, मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनवर कोरोनाचे सावट आहेच.
दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा 21 ऑगस्टच्या संध्याकाळपासून सुरु झाली आहे. तर 22 ऑगस्ट रोजी सूर्योदयापर्यंत पौर्णिमा असणार आहे.
रक्षाबंधन हा हिंदू सण आहे. जो भारताच्या विविध भागात साजरा केला जातो. मॉरिशस आणि नेपाळमध्ये देखील हा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. प्राचीन काळापासून रक्षाबंधन सण साजरा केला जात असून हा मुख्य हिंदू उत्सवांपैकी एक सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्याची कामना करते.
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त
पौर्णिमा तिथी – 21 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 07 वाजेपासून ते 22 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त – दुपारी 01 वाजून 42 मिनिटांपासून ते संध्याकाळी 04 वाजून 18 मिनिटांपर्यंत राहील
पंचांगानुसार भद्राची उपस्थिती सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत राहील. कोणत्याही परिस्थितीत भद्रकाळात राखी बांधू नये. भद्रकाळ हा विनाशकारी काळ मानला जातो. म्हणूनच याला अशुभ म्हटले जाते.
भद्राकाळात राखी का बांधू नये, जाणून घ्या यामागील कारणे
आख्यायिकेनुसार त्रेतायुगात रावणाने आपल्या बहिणीकडून भद्रा काळात राखी बांधून घेतली होती. यानंतर त्याच्या विनाशाला सुरुवात झाली होती आणि अखेर प्रभू श्रीरामांनी त्याचा वध करुन त्याला संपवलं होतं. त्यामुळे भद्रा काळात कोणतीही बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही.
राहू काळ कधी?
तर, राहू काळ संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 39 मिनिटांपर्यंत असेल. राहू काळातील कोणतेही काम यशस्वी होत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणून, राखी बांधण्याचे कामही राहु काळच्या वेळी करु नये. भद्रा आणि राहु काळ दोन्ही अशुभ मुहूर्त मानले जातात.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/