तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी नाकातून देण्यात येणाऱ्या स्वदेशी लसीला मंजुरी

Connect With Us

करोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक स्वदेशी लस विकसित होत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारत बायोटेकेने विकसित केलेल्या नाकातून देण्यात येणाऱ्या लसीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली आहे. लस निर्मितीत बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि त्याच्या पीएसयू बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (बीआयआरएसी)ने मदत केली आहे.या लसीचं नाव बीबीव्ही१५४ असं आहे. ही इंटरनेझल म्हणजेच नाकावाटे देण्यात येणारी लस आहे.

नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेजल व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू नेजल कॅव्हिटी म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतात. करोनाचा विषाणू फुफ्फुसांना सर्वाधिक धोका पोहचवतो.

दरम्यान,नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या मदतीने लसीकरण आणखीन सोप्प्या पद्धतीने करता येणार आहे. या लसीमुळे लसीच्या कुप्या, इंजेक्शन, सुया यांचा खर्च वाचवणार आहे.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us