भारताची बॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी

Connect With Us

tokyo2020 ; यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला बॉक्सर्सनी  दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. मेरी कोमने तिचा पहिल्या फेरीतील सामना जिंकला होता. तर मंगळवारी महिलांच्या ६९ किलो वजनी गटात लोव्हलिना बोर्गोहेनला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले होते. त्यापाठोपाठ बुधवारी ७५ किलो वजनी गटात भारताच्या पूजा राणीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

या दमदार कामगिरी मुळे पूजा राणी आता पदकापासून ती केवळ एक विजय दूर आहे. ३० वर्षीय पूजा राणीने ऑलिम्पिक स्पर्धांमधील पदार्पणाच्या लढतीत अल्जेरियाच्या २० वर्षीय इचारक चैबचा ५-० असा धुव्वा उडवला. पूजा राणी आणि चैबच्या वयातील १० वर्षांचा फरक या लढतीत दिसून आला.


Connect With Us

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *