Independence Day 2021 ; पंतप्रधान मोदींचे लाल किल्ल्यावरुन भाषण, केल्या महत्वाच्या घोषणा

Connect With Us

नवी दिल्ली : आज देशभरात ७५व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. देशात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करून स्वातंत्र्याला आणि आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जात आहे. प्रथेप्रमाणे या वर्षी देखील पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. यामध्ये करोनापासून देशातील क्रीडा क्षेत्र, तसेच उद्योग क्षेत्राविषयी देखील त्यांनी मत मांडलं. देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधानांनी टोकयो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचा खास उल्लेख केला.यावेळी देशभरातील मुलींसाठी पंतप्रधानांनी एक मोठी घोषणा केली आहे. एक मुलींसाठी सैनिक शाळा तर दुसरी 100 कोटी रुपयांची गती शक्ती योजना.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • मुलींनाही समान संधी मिळाली पाहिजे. मुली कोणत्याच क्षेत्रात कमी नाही. त्यामुळे आता देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुलींनाही प्रवेश देणार आहे.
  • भारत पुढच्या काही काळामध्ये प्रधानमंत्री गति शक्तीचा नॅशनल मास्टर प्लॅन देशासमोर ठेवणार आहे. १०० लाख कोटीपेक्षा अधिकच्या या योजनेच्या माध्यमातून लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हा असा मास्ट्र प्लॅन असेल, जो हॉलिस्टिक इंफ्रास्ट्रक्चरची पायाभरणी करेल.
  • जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार
  • नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा, भारताची ऊर्जा क्षेत्रातील मोठी प्रगती, जगात स्वच्छ उर्जासाठी भारताला ओळखलं जाईल
  • भारतासमोर दहशतवाद आणि विस्तारवाद या दोन समस्यांशी लढत आहे आणि त्याला चोख प्रत्त्युतर देखील देत आहे.
  • नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची एक अजून महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये स्पोर्ट्सला एक्स्ट्रा करिक्युलर ऐवजी मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा भाग बनवण्यात आले आहे. जीवनात पुढे जायचे असेल तर त्यामध्ये क्रीडा हेसुद्धा महत्त्वाचे प्रभावी माध्यम आहे.
  • आपल्याकडे जर स्वत:ची लस नसती तर? भारतात स्वत:ची पोलिओ लस मिळण्यासाठी किती वेळ गेला. पण आज आपण गर्वाने सांगू शकतो की, जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरु आहे.
  • भारतातील उत्पादकांनी त्यांचे उत्पादन भारताची ओळख असल्याचं लक्षात ठेवावं. जगाच्या बाजारपेठेवर आपलं अधिराज्य असावं हे स्वप्न देशातील उत्पादकांनी पाहावं. सरकार त्यांच्यासोबत उभं असेल. सरकार देशातील स्टार्ट-अपसोबतही उभं आहे
  • वाढत्या लोकसंख्यामुळे कुटुंबात विभागणी होऊन गावांमध्ये शेतकऱ्यांकडील जमिनीचं प्रमाण कमी होतंय. हे मोठं आव्हान आहे. सध्या देशात 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जितकं लक्ष द्यायला हवं होतं तितकं आधी दिलं गेलं नाही. आत्ता या शेतकऱ्यांवर लक्ष दिलं जातंय
  • लवकरच ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वे मार्गाने जोडले जाईल. या राज्यांना देशाच्या विकासाचा भाग बनवावं लागेल. हे काम देशाच्या अमृतमहोत्सवाआधी पूर्ण करावं लागेल
  • उज्वला योजनेपासून आयुष्मानपर्यंत योजनांची ताकद सर्वसामान्यांना माहिती आहे. मात्र, इतक्यावरच थांबायचं नाहीये. 100 टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, सर्वांकडे बँक खाते असावेत, सर्वांकडे आयुष्मान कार्ड असावे, घरकुल योजनेतून प्रत्येक हक्काच्या व्यक्तीला घर द्यायचं आहे
  • देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम केली. म्हणूनच हा फाळणीचा दिवस यापुढे दरवर्षी साजरा केला जाईल. या दिवशी फाळणीमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांची आठवण केली जाईल

Connect With Us