यंदाच्या बारावीच्या निकालात १२ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण तर ४७८९ विद्यार्थी नापास
मुंबई : १२वीचा निकाल आज दुपारी चार वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापुर्वी मंडळाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. १२ वीचा एकूण निकाल 99.63 टक्के लागला आहे.
१२ वीच्या परीक्षेत राज्यातील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्याथ्यांपैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षण विभागाने मूल्यमापनासाठी दहावीसाठी ३० टक्के, अकरावीसाठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी केली होती. त्यानुसार यंदाच्या निकालात १२ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत तर ४७८९ विद्यार्थी नापास झाले आहेत.
दरम्यान, बारावीत राज्यातील ४६ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहे. शाखानिहाय निकालात सर्वाधिका निकाल वाणिज्य शाखेचा 99 .91टक्के लागला आहे. विज्ञान 99.55 कला 99.83 टक्के निकाल लागला आहे. एमसीव्हीसीचा निकाल 98.8 टक्के लागला आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7