मुंबई हादरली ! दिल्लीच्या निर्भया घटनेची पुनरावृत्ती; महिलेवर सामूहिक बलात्कार करून गुप्तांगात घुसवला रॉड
मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचा संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 ऑगस्ट) घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दरम्यान, महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती गंभीर आहे. पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असून डॉक्टर मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. ती अद्यापही बेशुद्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/