राज कुंद्रा यांना तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई : पोर्नोग्राफीक फिल्म्सची निर्मिती करून तिचे वितरण केल्याप्रकरणी आरोपी असलेले व्यावसायिक व अभनेत्री शिल्पा शेट्टीचे पतीराज कुंद्रा यांना मुंबई क्राईम ब्रँचने २९ जुलै रोजी अटक केली. अटकेनंतर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच कुंद्रा यांनी केलेल्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी ठेवली.
दरम्यान, राज कुंद्रा यांना तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. सरकारी वकिलांची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही दिलासा देणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. राज कुंद्रा यांनी त्यांच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर २९ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाने पोलिसांना दिले.