“महिलांच्या बाबतीत हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील” राष्ट्रीय महिला आयोगाने सुनावले

Connect With Us

मुंबईतील साकीनाका याठिकाणी खैरानी रोड परिसरात बलात्कार झालेल्या 30 वर्षीय महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेची दखल घेऊन  राष्ट्रीय महिला आयोगाचं पथकं मुंबईत दाखल झालं आहे. महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

पोलिसांकडून संबधित घटनेची माहिती घेतली आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी सांगितले.

मुंबईत गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु असताना भररस्त्यात अशी घटना घडते हे दुर्दैव आहे. आरोपींना कोणाची भीती नाही आहे. आरोपींच्या मनात भीती असती तर अशी घटना घडली नसती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आठवडाभरात बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामागे राज्यशासनाचा निष्काळजीपणा आहे. कायदेव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडल्या आहेत,” असे महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटले आहे.

राज्य महिला आयोगाची नेमणूकच नाही. 

“संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे मात्र महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. राज्य महिला आयोग नसेल तर अश्या वेळी पीडित महिलेने कोणाकडे मदत मागयची ? इथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. मला हे कळत नाही की सरकार इतकं असंवेदनशील कसं आहे की, त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही. महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील आहे.  राज्य सरकारने याबाबत उत्तर द्यायला हवं,” असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटले आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us