सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार : संभाजीराजे
पुणे : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरजने सुवर्ण पदकावर स्वतःच नाव कोरून भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. दरम्यान, आता नीरजला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण देणार आहोत. महाराष्ट्रात त्यांचा सत्कार केला जाईल, अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक पार पडली. यावेळी खासदार संभाजीराजे उपस्थित होते. तेव्हा ही घोषणा केली.
नीरज चोप्राच्या खेळीकडे संपूर्ण भारताच्या नजरा लागल्या होत्या. त्याचवेळी नीरजनं 130 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. या स्वप्नपूर्तीनंतर आता नीरज चोप्राचा त्याच्या घरी जाऊन सत्कार करणार आहोत. तसेच त्याला महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण देऊनही सत्कार केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/