नाशिक: फरार शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्यावर राज्य सरकारची मोठी कारवाई
नाशिक : शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांना लाचप्रकरणात चालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ लाखांची लाच घेताना पकडले आहे. काल सकाळी त्यांना पोलीस स्टेशन तसेच, कोर्टातही हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या हजर राहिल्या नाही. त्यामुळे वैशाली झनकर वीर पसार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात शालेय शिक्षण मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून याचा मोठा फटका वैशाली झनकर यांना सहन करावा लागणार आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निष्काळजीपणामुळे त्या फरार झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
वैशाली झनकर वीर यांच्या कृत्यामुळे सरकारची प्रतिमा मलील झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात वैशाली वीर यांचं सरकारडून निलंबन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात सेवा तरतुदीनुसार शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे निलंबन प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे शिक्षण आयुक्तांना आदेश दिले आहेत.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/