स्पायनल मस्क्युलर अट्रोफी या दुर्मिळ आजारावर आता होणार मोफत उपचार
मुंबई : स्पायनल मस्क्युलर अट्रोफी या दुर्मिळ आजाराशी झुंज देणाऱ्या वेदिका शिंदे या चिमुकलीचा १ ऑगस्ट (रविवारी) मृत्यू झाला. वेदिकाला उपचारासाठी दीड महिन्यांपूर्वी १६ कोटींचे इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र तरीही वेदिकाची मृत्यूशी झूंज अपयशी ठरली. परंतु आता मुंबईतील नायर रुग्णालयात एसएमएवर मोफत उपचार दिला जाणार आहे. नायर रुग्णालयाच्या शतकपूर्तीनिमित्त एसएमए आजार असलेल्या १९ रुग्णांना नवजीवन देण्याच्या कार्यक्रमाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
एसएमए हा दूर्मिळ आजार १० हजार मुलांपैकी एकाला मुलाला होतो. या आजाराच्या उपचारासाठी लागणारे इंजेक्शनाची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची आहे. पण नायरमध्ये हेच इंजेक्शन मोफत दिले जाणार आहे. बायोजेन कंपनीकडून ‘स्पिनराज’ इंजेक्शन हे रुग्णांना आयुष्यभरासाठी मोफत दिले जाणार आहे. अमेरिकेतील एनजीओ डायरेक्ट रिलीफ हे नायर रुग्णालयाला यासाठी मदत करत आहे
याबाबत नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक यांनी सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रत्येक मुलाला पहिल्या वर्षी सात इंजेक्शन देण्यात येतील, ज्याची किंमत सहा कोटी रुपये असेल. त्यानंतर दरवर्षी चार इंजेक्शन दिले जाईल, ज्याची किंमत ३.२ कोटी रुपये असेल.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7