स्टार केअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर
नाशिक : नाशिक येथील स्टार केअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजन करण्यात आले आहे. जुने सायखेडकर हॉस्पिटल, एस. एन. प्लाझा त्रिमूर्ती चौक, सिडको नवीन नाशिक येथे रविवार दि ५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान होणार आहे. या शिबिरास डॉ. अश्विन पारखे (अस्थिरोग तज्ञ), डॉ. एल. पी. चौधरी, डॉ. संतोष खैरनार, डॉ. अखिलेश सोमाणी, डॉ. रिता पाटील या तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी, सर्व हाडांचे, संधिवात, मणक्यांचे विकार, गुडघेदुखी, सर्व स्त्रियांचे आजार, वांधत्व निवारण, प्रसूती पूर्व तपासणी , बॉडीमास्क इंडेक्स तपासणी, पल्सओक्सिमेट्री तपासणी, सर्व कॅन्सर व गाठींची तपासणी, तसेच पोटांचे विकार, हार्निया, आतड्यांचे विकार, पोटातील अल्सर, मूळव्याध, भगंयदर आदींची तपासणी करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर, या शिबिरात B.M.D (हाडांचा कमजोरपणा ) वरील विशिष्ट यंत्राचे टेस्ट रु २००० ची तपासणी मोफत केली जाणार असून, BSL व युरिक अँसिड ची तपासणी ही मोफत केली जाणार आहे. तसेच ई.सी. जी व एक्स रे वर ५० % सवलत दिली जाणार आहे. गरजूंना ८०० रू ची थायरोईड तपासणी १०० रुपयांत करून दिली जाणार आहे. पुढील तपासणी व शस्त्रक्रिया सवलतिच्या दरात केल्या जाणार आहे, काही औषध शिबिराच्या ठिकाणी मोफत मिळतील. शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्टार केअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल समितीने केले आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा