दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंदी

Connect With Us

गेल्यावर्षी दिवाळीत झालेलं वायू प्रदूषण पाहता यावर्षी आधीच केजरीवाल सरकराने फटाके बंदीचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे या वर्षी दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

“गेल्या ३ वर्षांपासून दिवाळीच्या वेळी दिल्लीच्या प्रदूषणाची धोकादायक स्थिती पाहता, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवणुकीवर, विक्रीवर आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली जात आहे. जेणेकरून लोकांचे जीव वाचवता येतील. तसेच गेल्या वर्षी, व्यापाऱ्यांनी फटाके साठवल्यानंतर, प्रदूषणाचे गांभीर्य पाहता उशीरा पूर्ण बंदी घालण्यात आली, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी फटाक्याची साठवण न करण्याचे आवाहन सर्व व्यापाऱ्यांना करण्यात येत आहे.” अस ट्विट केजरीवाल यांनी  केल आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us