ओबीसी आरक्षणाबाबत पुढच्या शुक्रवारी अंतिम निर्णय ; नाना पटोले यांची माहिती
मुंबई : अनेक दिवसांपासून राज्यात ओबीसी आरक्षणावरून अनेक मतमतांतरे सुरू आहेत. दरम्यान आज ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बैठक घेण्यात असून, ओबीसी आरक्षणाबाबत येत्या शुक्रवारी पुन्हा यावर चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी ही बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार झाले होते. सकाळी ११ वाजता सह्याद्री गेस्ट हाउसवर ही बैठक सुरु झाली होती. या बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधी ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आलं.
तसेच, “महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यांमध्ये आरक्षण कायम राहणार असून १६ जिल्ह्यांमध्ये कमी जास्तपणा होणार आहे,ओबीसी आरक्षण कायम ठेवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी एकमत होऊन त्यावर मार्ग कसा काढता येईल त्यावर चर्चा झाली आहे. येत्या शुक्रवारी पुन्हा यावर चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल,” असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. “ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसींसाठी आरक्षण नाही तिथे ते कसे लागू करता येईल यासाठी चर्चा करण्यात येणार आहे”. असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाबाबत कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. “सरकारने कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही. त्यांनी आमची मतं जाणू घेतली आहेत. मतं जाणून घेताना जो काही निर्णय आहे त्याचे पृथ्थकरण मी केलेलं आहे. के. कृष्णमृती आणि खानविलकर यांनी दिलेल्या निर्णयात अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की, राजकीय मागासपणाची चौकशी करायची आहे. याचा जणगणनेशी कुठलाही संबंध नाही आहे. ही त्रिस्तरीय चौकशी करायची आहे. यामध्ये पहिल्या भागात आयोगाची नेमणूक करणे आपण पूर्ण केला आहे. दुसऱ्या भागात राजकीय मागासपणाची चौकशी करण्याचे काम या आयोगाला करायचे आहे. त्यामुळे जोपर्यंत आयोग इम्पिरिकल डेटा तयार करत नाही तोपर्यंत हे आरक्षण परत येऊ शकत नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“इम्पिरिकल डेटा तयार करुन आयोगाने सादर केला तर त्याच्या तपशीलात जाण्याचा कोर्टाला अधिकार नाही असे ना. चंद्रचूड यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे. मराठा आरक्षणाप्रमाणे माहिती पुढील तीन ते चार महिन्यात तयार केली जाऊ शकते. त्यामुळे ओबीसीचं आऱक्षण हे निवडणुकांच्या आधी परत करु शकतो,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/