छगन भुजबळ यांच्या विरोधात आयकर विभागाकडून तक्रार दाखल; १०० कोटींचे बेनामी व्यवहार

Connect With Us

नाशिक : १०० कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहार केल्याप्रकरणी आयकर विभागाने मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. छगन भुजबळ त्यांचा मुलगा पंकज, पुतण्या समीर आणि त्यांच्या विविध कंपन्यांविरोधात ही तक्रार दाखल केलेली आहे.

दरम्यान, तक्रारीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात साखर कारखाना १७.८२ कोटी रुपये, पनवेल येथील रोहिंजन गावातील जमीन ६६.९० कोटी रुपये, अंधेरी १७.२४ कोटी रुपये आणि सांताक्रूझ मधील ७.७२ कोटी रुपयांच्या जमिनीचा समावेश आहे. या जमिनी छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी बेनामी कंपन्यांद्वारे केलेल्या गुंतवणुकीचा वापर करून खरेदी केल्याचा आरोप आहे.

तसेच, आयटी अधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईतील न्यायालयात भुजबळ, समीर, पंकज आणि हे दोघंही संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या फर्मविरोधात तक्रार दाखल केली आहे. परवेझ कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आर्मस्ट्राँग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये ही रक्कम वळवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानंतर ही रक्कम भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरली होती. कोलकाता, मुंबई आणि इतर ठिकाणाहून एंट्री ऑपरेटरद्वारे पैसे पाठवले गेले आणि नंतर शेअर भांडवलाच्या नावावर त्या कंपन्यांमध्ये पैसे लावले गेले, असं सांगण्यात आलंय.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us