साकीनाका बलात्कार प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा ; भीम आर्मीची मागणी
मुंबई : काही दिवसांनआधी मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. . आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचा संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं.पीडितेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते मात्र, दुर्देवाने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय
दरम्यान, साकीनाका येथील बलात्कार प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा तसेच कुटुंबीयांना शासनाने आर्थिक सहाय्य करण्यासह सदनिका द्यावी, अशी मागणी भीम आर्मीने केली. या तसेच इतर मागण्यांना घेऊन भीम आर्मी तसेच भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने काल (12 सप्टेंबर) साकीनाका पोलीस ठाणे येथे जोरदार निदर्शने केली.
महाराष्ट्रासाठी आवश्यक असलेला शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा. साकीनाका प्रकरणातील इतर आरोपींचा शोध लवकरात लवकर घ्यावा. तसेच सर्व आरोपींविरोधात 307, 376 भादंवि कलमांसह 302 व अॅट्राॅसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा. साकीनाका पिडीतेच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे त्यांच्या संगोपनाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. तसेच विशेष बाब म्हणून रूपये 50 लाखाचे आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी भीम आर्मीने केली.
तसेच पिडीतेच्या कुटुंबीयांना शासनाने एक सदनिका द्यावी. गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यास दिरंगाई करावी व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल न करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करावी. अमरावती व पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी अशा मागण्या भीम आर्मीने आपल्या निवेदनात केल्या.
यावेळी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील थोरात, रमेश बालेश तसेच संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलकांनी साकीनाका पोलीस ठाण्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मागण्यांचे नवेदन दिले. तसेच पोलिसांनी पीडीतेच्या कुटुंबियांना घेऊन कालच घाईघाईने अंत्यसंस्कार उरकल्याचा आरोपही केला.
दरम्यान, साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या करण्याचा झाल्यानंतर वातावरण चांगलेच चिघळले आहे. या प्रकरणातील दोषी आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षातर्फेदेखील अंधेरी साकिनाका येथील सिग्नल जवळ जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी राज्य मंत्री अविनाश महातेकर, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/