पुढील चार दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा ! गणेशोत्सवातही सक्रिय राहण्याची शक्यता
मुंबई : राज्यात सोमवारपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने सांगली सोलापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ६ ते ९ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात चार दिवस पावसाचा जोर राहणार आहे. या दरम्यान काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. या क्षेत्रामुळेही राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस पाऊस होणार आहे. ६ आणि ७ सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळातही पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/