शिवसेना खासदार भावना गवळींच्या शिक्षण संस्थांवर ईडीची कारवाई, 5 ठिकाणांवर छापेमारी
यवतमाळ : यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचं पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे. रविवारी शिवसेना नेते अनिल परब यांनी ईडीनं नोटीस पाठवली. त्यानंतर आज यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीकडून गवळी यांच्या संस्थेत कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ येथील संस्थांवर धाडी टाकल्या. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्याचं समजतंय. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे ईडीनं या धाडी टाकल्याचं समोर येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीनं धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/