घरगुती सिलेंडरच्या (एलपीजी) दरात पुन्हा वाढ !
नवी दिल्ली : घरगुती (एलपीजी) सिलेंडरच्या किमती बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत . याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे.
ताज्या दरवाढीनंतर, १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये ८८४.५० प्रतिलीटर असेल. मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर आता ८८४.५ रुपये आहे, पूर्वी तो ८५९.५० रुपयांमध्ये विकला जात होता. चेन्नईमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला आजपासून ९००.५० रुपये भरावे लागतील, कालपर्यंत ७५५.५० रुपये भरावे लागत होते. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एलपीजी सिलेंडरसाठी तुम्हाला ८९७.५ रुपये भरावे लागतील.
याआधी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या होत्या. तर मे आणि जून महिन्यात सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. तसेच एप्रिलमध्ये सिलिंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.
सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी काढून टाकली. या मासिक वाढीमुळे मे २०२० पर्यंत सबसिडी काढून टाकली गेली. घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत १ मार्च २०१४ रोजी ४१०.५ रुपये प्रति सिलेंडर होती.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/